खतांचे नवे दर जाहीर, पहा कोणत्या खत किती रुपयांना लागणार ?, जाणुन घ्या खतांचे नवीन दर. fertilizer new price list - Shivsangharsh News

Monday, May 23, 2022

खतांचे नवे दर जाहीर, पहा कोणत्या खत किती रुपयांना लागणार ?, जाणुन घ्या खतांचे नवीन दर. fertilizer new price list

fertilizer-new-price-list
fertilizer new price list

    खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या 50 किलोच्या एका गोणीमागे 600 ते 700 रुपये इतक्या प्रमाणत दरवाढ केल्यामुळे शेतकरी आता चिंतेत होते.

    या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी DAP खतांवरील अनुदानात वाढ केल्याचं देखील संगितलं आहे, पण पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात इतर खतांच्या अनुदाना विषयीचा काहीच केला उल्लेख नाही.

    त्यामुळे मग फक्त DAP चीच दरवाढ कमी होईल का, असा प्रश्न प्रत्येक शेतकरी विचारत होते.

    पण, आता शासनाने DAP (डाय-अमोनियम फॉस्फेट) या बरोबरच P&K (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठी सुद्धा subsidy जाहीर केली आहे. या करणामुळे आता सर्वच खतांचे दर कमी होणार आहे.

    आता आपण शासनाच्या खतांसाठी जारी केलेलं अनुदान आणि कंपन्यांनी जाहीर केलेले खतांचे नवे दर या विषयीची सर्व माहिती जाणून घेऊया.


खतां वरील subsidy त वाढ :-

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 मे रोजी DAP (डाय अमोनियम फॉस्फेट) या खताच्या एका गोणीवरचं अनुदान आता 500 रुपयांवरून ते 1200 रुपयांपर्यंत वाढवलं आहे. यामुळे सर्वच कंपन्यांची DAP खताची एक गोणी आता शेतकऱ्यांना जवळ पास 2400 रुपयां ऐवजी आता फक्त 1200 रुपयांना मिळणार आहे.

    या बरोबर 20 मे रोजी केंद्रीय खते मंत्रालयानं एक नोटिफिकेशन देखील जारी केलं. त्यानुसार फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी (P&K fertilizer) subsidy जाहीर करण्यात आली आहे.

    विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या subsidy त वाढ देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता खतांमध्ये झालेली दरवाढ आता कमी होणार आहे.

    केंद्र शासनाकडून राखायनिक खतांवर NBS (Nutrient Based Subsidy) या योजनेअंतर्गत अनुदान देखील दिलं जातं. म्हणजेच खतां मधील पोषक द्रव्यांच्या आधारावर म्हणजे त्या खतात किती किलो नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर आहे, यानुसार ही subsidy दिली जाणार आहे.

    2020-21 मध्ये नायट्रोजनसाठी प्रतिकिलो दर 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो दर 14.888 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो दर 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो दर 2.374 रुपये इतक्या प्रमाणत अनुदान निश्चित करण्यात आलं होतं.

    आता 2021-22 च्या खरीप हंगामासाठी नायट्रोजनसाठी प्रतिकिलो दर 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो दर 45.32 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो  दर 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो दर 2.374 रुपये इतक्या प्रमाणत अनुदान निश्चित करण्यात आलं आहे.

    गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षासाठी फॉस्फेटसाठीचं अनुदान 14.888 रुपयांहून अधिक आत 45.32 रुपये करण्यात आलं आहे.

खतांचे नवे दर :-

    भारतात सर्वात जास्त हा यूरिया या खताचा वापर केला जातो. यंदा यूरियाचे दर 'जैसे थे' म्हणजेच जश्यास तशे ठेवण्यात आले होते. यूरिया खताच्या दारात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच सर्वत खत उत्पादक कंपन्यांची यूरियाची 45 किलोची एक बॅग शेतकऱ्यांना फक्त 266 रुपयांनाच मिळणार आहे.

    आता आपण कंपनीनुसार खतांच्या इतर ग्रेड्सच्या किंमती पाहणार आहोत. 

1) इफ्को (Indian Farmers Fertiliser Cooperative Limited) नवे खतांचे दर जाहीर केलेत.

    कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार 20 मे 2022 पासून या नवे दरानं खतांची विक्री करताना दिले जाणार आहे.

Indian Farmers Fertiliser Cooperative Limited कंपनीचे नवे दर
Indian-Farmers-Fertiliser-Cooperative-Limited
Indian Farmers Fertiliser Cooperative Limited
    या बरोबर कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हे देखील म्हटलंय की, बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त MRP च्या छापील बॅगासुद्धा नवे दरानं विकण्यात येतील.

    म्हणजे सध्या बाजारात इफ्कोची NPK 10-26-26 ची एक बॅग 1775 रुपयां पर्यंत उपलब्ध आहे, ती इथून पुढे आता 1175 रुपयांना विकली जाईल.2) ADVENTZ ग्रूपअंतर्गत येणाऱ्या Zuari Agro Chemicals Ltd. (जय किसान या ब्रँड नावानं खत विक्री), Mangalore Chemicals and Fertilizers Limited (जय किसान मंगला या ब्रँड नावानं खत विक्री) आणि Pradeep Phosphates Ltd. (जय किसान नवरत्न या ब्रँड नावानं खत विक्री) या तिन्ही कंपन्यांचे त्यांचे नवे दर प्रसिद्ध केले आहेत.

    हे नवे दर 20 मे 2021 पासून लागू करण्यात येणार आहेत. तसंच या कंपन्यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात हे सुद्धा स्पष्ट केलंय की, या कंपन्यांच्या बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त MRP च्या छापील बॅगासुद्धा नवे दरानं विकण्यात येतील.

जय किसानच्या नवे खतांचे दर
ADVENTZ
ADVENTZ 

4)  Coromandel ही खत उत्पादक कंपनी Gromore या नावानं खताची विक्री करते.

    कंपनीनं 20 मे 2021 पासून नवे दर लागू केलेत. जुने खात किंवा खताचे पोते ज्यावर जास्तीची म्हणजेच दरवाढ झाली तेव्हाची MRP असेल तो सुद्धा या नवे दरानेच खता विकावा, असंही कंपनीनं सांगितलं आहे.

कोरोमंडलच्या नवे खतांचे दर
Coromandel
Coromandel 

4) SmartChem Technologies Ltd.  ही कंपनी 'महाधन' या खंतांची विक्री करते.

    20 मे पासून खतांची नवे दरानं खतांची विक्री होणार आहे.

महाधनच्या खतांचे नवे दर
SmartChem-Technologies-Ltd
SmartChem Technologies Ltd

5) Gujarat State Fertilizers and Chemicals Ltd. ही कंपनी 'सरदार' या नावानं खतांची विक्री करते.
    
    या कंपनीनं सुद्धा त्यांच्या खतांचे नवे दर प्रसीद्ध केले आहेत.

सरदारच्या खतांचे नवे दर
Gujarat-State-Fertilizers-and-Chemicals-Ltd
Gujarat State Fertilizers and Chemicals Ltd

6) Indian Potash Limited  ही कंपनी बाजारात 'IPL' या नावानं खतांची विक्री करते.

    या कंपनीनं त्यांचे सुधारित नवे दर प्रसिद्ध केले आहेत.

IPLचे खताचे नवे दर
Indian-Potash-Limited
Indian Potash Limited

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?