![]() |
E Mudra Loan |
Mudra Loan : प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेला (PM Mudra Loan-PMMY) यंदा तरुण व्यावसायिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. या आर्थिक वर्षात स्वतःचा व्यवसाय (Business) सुरु करण्याचे अनेकांचे स्वप्न या योजनेमुळे साकार झाले आहे. तर काहींच्या स्वप्नांना मुद्रा कर्ज (E Mudra Loan) योजनेतील निधीने उभारी दिली आहे.
कोणताही व्यवसाय करायचा म्हटला तरी भांडवलाची (capital) आवश्यकता ही असतेच. कोणतीही मोठी गुंतवणूक करायची म्हणजे भांडवल उभे करणे आलेच. त्यासाठी प्रत्येकाकडे हा पर्याय असेलच असे नाही. ही अडचण लक्षात घेत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) आर्थिक मदत करत आहे.
मुद्रा कर्ज योजनेला (E Mudra Loan) त्यामुळेच तरुणाईकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 50 हजार ते 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. या कर्ज योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला कर्ज घेताना कुठलेही तारण द्यावे लागत नाही. प्रक्रिया शुल्कही देखील अर्जदाराकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात मुद्रा कर्ज योजनेला (E Mudra Loan) प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
👇👇👇👇👇
👉 👉 येथे क्लिक करा 👈 👈
आतापर्यंत १ लाख कोटींचे कर्ज वाटप
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्ज वितरण जास्त झाले आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजने (PMMY) अंतर्गत छोट्या व्यावसायिक कर्जाच्या वितरणात चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कर्ज वाटपाने १ लाख कोटींचा टप्पा देखील ओलांडला आहे.
या 26 ऑगस्टपर्यंत १,०८,६३२ कोटी रुपयांचे कर्ज देखील वितरित करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच पाच महिन्यांत वितरणाची रक्कम ही गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वितरणाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे.सप्टेंबर २०२१ मध्ये मुद्रा कर्ज (E Mudra Loan) योजनेअंतर्गत सुमारे 98 हजार कोटी कर्ज वाटप देखील करण्यात आले होते.
तर मग आता कर्ज कसे मिळवायचे ?
तुम्ही जवळच्या बँका किंवा वित्तीय संस्थांमध्ये कर्जासाठी चौकशी करु शकता. कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ http://www.mudra.org.in/ ला देखील भेट देऊ शकता. येथून अर्ज डाउनलोड करता येईल. त्यानंतर सर्व तपशील भरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. पुढील सोपास्कार आणि प्रक्रिया संबंधित बँकेतील शाखा व्यवस्थापक करत असतो.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो?