गेवराई मध्ये घडला धक्कादायक प्रकार; नवरा आवडत नाही म्हणून बायकोनेच केला लग्नाच्या 21 दिवसानंतर पतीचा खून - Shivsangharsh News

Sunday, November 13, 2022

गेवराई मध्ये घडला धक्कादायक प्रकार; नवरा आवडत नाही म्हणून बायकोनेच केला लग्नाच्या 21 दिवसानंतर पतीचा खून


गेवराई मध्ये घडला धक्कादायक प्रकार; नवरा आवडत नाही म्हणून बायकोनेच केला लग्नाच्या 21 दिवसानंतर पतीचा खून



 पती आवडत नसल्यानं लग्नानंतर 21 दिवसात पत्नीकडून पतीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.  बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 8 नोव्हेंबर रोजी गेवराईमधील पांडुरंग चव्हाण यांची हत्या झाली होती. हत्येनंतर पांडुरंग यांच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयावरून त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी सुरू होती. अखेर आज संशयित पत्नीने पोलिसांना आपणच पांडुरंग यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय. शीतल चव्हाण असं संशयित आरोपी पत्नीचं नाव आहे. गेवराई पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झालाय. 


लग्नाच्या 21 दिवसानंतरच एका तरुणाचा गळा दाबून खून झाल्याचा प्रकार बीडच्या गेवराईमध्ये मागच्या आठवड्यात उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी पांडुरंग चव्हाण या मयत तरुणाच्या पत्नीला ताब्यात घेतलं होतं आणि तिची चौकशी केल्यानंतर पांडुरंगाची पत्नी शीतलनेच त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. 



एका महिन्यापूर्वी शीतल आणि पांडुरंग यांचा विवाह झाला होता. मात्र शीतल आपल्या पतीपासून खुश नसल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या पतीचाच गळा दाबून हत्या केली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांनी शीतलवर पांडुरंग चव्हाण यांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


महत्वाच्या बातम्या

तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघातात मृत्यू


फेसबुक लाईव्हवर ग्रायंडर मशीनने प्रियकराने चिरला स्वत:चा गळा; प्रेयसीमुळे घेतलं टोकाचं पाऊल






No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?