लोकनेते स्व.विनायकराव मेटे यांचा वैचारिक वारसा जोपासत महापुरुषांच्या जयंती दिनी शिवसंग्रामच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न.. - Shivsangharsh News

Friday, April 14, 2023

लोकनेते स्व.विनायकराव मेटे यांचा वैचारिक वारसा जोपासत महापुरुषांच्या जयंती दिनी शिवसंग्रामच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न..


 लोकनेते स्व.विनायकराव मेटे यांचा  वैचारिक वारसा जोपासत महापुरुषांच्या  जयंती दिनी  शिवसंग्रामच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न..


 महापुरुषांची जयंती ही सामाजिक उपक्रमाने साजरी करावी ; लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांचे विचार प्रत्यक्षात आणले... ॲड.राहूल मस्के, सुनिल शिंदे


" डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिवसंग्रामच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न...शिवसंग्राम "


बीड [वार्ताहर ] भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी  पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,बीड येथे शिवसंग्रामच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या हस्ते संपन्न झाले .याप्रसंगी  शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते .

  ज्ञानियाचा अथांग सागर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले. तसेच शिवसंग्रामच्यावतीने उपस्थित अनुयायास पाणी वाटप करण्यात आले व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिरामध्ये बीड शहरातील अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

  

     शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब नेहमी सांगत असत महापुरुषांच्या जयंती वा पुण्यतिथी ही विविध सामाजिक उपक्रमाने राबवावी जेणेकरून वंचित उपेक्षकांचे प्रश्न मार्गी लागावे . जयंती ही नाचून नव्हे तर वाचून साजरी करावी . गोरगरीब वंचित उपेक्षितांना मदत व्हावी, दिशा मिळावी सर्वसामान्यचे प्रश्न सुटण्यासाठी मार्गदर्शक ठरावी . खऱ्या अर्थाने हीच जयंती महापुरुषांना अपेक्षित असते म्हणून शिवसंग्रामच्या माध्यमातून विविध महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी ही सामाजिक उपक्रमानेच साजरी केली जाते याचाच एक भाग म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले व खऱ्या अर्थाने सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी व महिला भगिनी व गरजू रुग्णांकरिता रक्तपेढी निर्माण व्हावी हा उदात्त हेतू समोर ठेवून शिवसंग्रामच्या माध्यमातून जयंती साजरी करण्यात आली. विनोददादा हातागळे  यांच्यासह अनेक विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. पोलीस अधीक्षक मा.नंदकुमारजी राठोड, सुशीलाताई मोराळे, विलासराव विधाते यांनी   रक्तदान शिबिरास भेट देत रक्तदात्यांचा उत्साह वाढवला याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणदादा काशीद,  ओबीसी आघाडीचे विभागीय अध्यक्ष लक्ष्मण दादा ढवळे, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे,जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील,नितीनजी लाठकर,बीड शाहराध्यक्ष अड. राहुल मस्के,बीड तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, युवक प्रभारी प्रा.सुभाष जाधव सर,शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय माने, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा.पंडित शेंडगे, शेख कुतुबभाई, शेख अजहर भाई, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले, युवक शहर उपाध्यक्ष अनिकेत देशपांडे, पेठ बीड विभाग प्रमुख प्रकाश जाधव, शिवसंग्राम नेते ज्ञानेश्वर कोकाटे, मनोज जाधव, मागदे सर,मुकुंद गोरे, नितीन आगवान, पांडुरंग आवारे पा.युवक तालुकाध्यक्ष गणेश साबळे, युवा नेते शैलेश सुरवसे, हरिश्चंद्र ठोसर,अशोक लोकरे,पांडुरंग बहिर,राहुल हजारे, उत्तरेश्वर यादव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अड.मनीषाताई कुपकर,माजी सभापती मनीषाताई कोकाटे, महिला आघाडी गेवराई  तालुकाध्यक्षा साधनाताई दातखिळ, बीड शहर उपाध्यक्षा संगीताताई ठोसर, रेखाताई तांबे,  गीतांजलीताई डोरले व अन्य शिवसंग्राम पदाधीकरी  कार्यकर्ते उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?