कृषी ऊत्पन्न बाजार समिती निवडणूकीत .घनसावंगीत ठाकरे गटांत पडली फुट - Shivsangharsh News

Thursday, April 27, 2023

कृषी ऊत्पन्न बाजार समिती निवडणूकीत .घनसावंगीत ठाकरे गटांत पडली फुट


 कृषी ऊत्पन्न बाजार समिती निवडणूकीत .घनसावंगीत ठाकरे गटांत पडली फुट 


  कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी÷ गणेश ओझा


 घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक पदाच्या जागांसाठी शुक्रवार दि.28एप्रिल रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे. विशेष म्हणजे केवळ एका जागेसाठी आ.राजेश टोपे यांच्या कर्मयोगी अंकुशराव टोपे शेतकरी विकास पॅनल सोबत माजी आमदार शिवाजी चोथे यांनी युती केली आहे.तर भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट प्रत्येकी नऊ जागा लढवणार आहे. राजेश टोपे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी डॉ हिकमत उढाण व भाजप नेते सतीश घाटगे  निवडणूक एकत्र लढवीत आहेत निवडणुकीतील चुरस वाढली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक तथा शिंदे गटाचे उपनेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर यांनी भाजपाला पाठिंबा देण्याची सुचना केल्याची माहिती माजी जि.प.सदस्य शामनाना उढाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दरम्यान, राज्यात भाजपा आणि शिंदे गटाविरूद्ध जंग पछाडलेल्या उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातच घनसावंगीत दोन गट पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाची निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. कारण याच कृऊबा निवडणुकीच्या निकालावर विधानसभा निवडणूक निकालाचे अंदाज वर्तविले जाऊ शकतात,असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?