महसूल आणि पोलिसांच्या आशीर्वादाने वाळू माफियांचा धंदा जोरात
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात
पैठण प्रतिनिधी:- गोविंद बावणे
पैठण तालुक्यातून बेकायदेशीर वाळू वाहतूक काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून महसूल आणि पोलिसांच्या आशीर्वादाने पैठण तालुक्यातील बहुतांश गावांमधून परजिल्ह्यातील गावांमध्ये वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील कावसान,चनकवाडी पाटेगाव दादेगाव नवगाव हिरडपुरी भागातून सदरील वाहतूक सुरू सुरू असून या भागातील बिट अंमलदारांचे आणि तलाठ्यांचे तसेच महसुलच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.नकवाडी येथील हायड्रोजवळ गोदावरी नदी पात्रात दररोज रात्री बेसुमार वाळू उत्खनन करून वाळू चोरी होत आहे. पैठण तहसील यांनी पथकातील अधिकारी यांना वारंवार फोनद्वारे कळवून सुद्धा त्यांनी वाळूचोरी विषयी काही ठोस भूमिका घेत नाही.
बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी सुरु होतात. या काळात पेट्रोलिंग करणारे पोलिस आणि वाळू माफियांचा बीमोड करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महसुल कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या नाकावर टिच्चून सदरील आहे. ट्रॅकर व हायवा बेदरकारपणे धावतात.
अशा परिस्थितीत या वाहनांना रोखून त्यांच्यावर कारवाई करणे तर दूरच उलट तोडपाणी करून ती सोडली जातात. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूलला चुना लागत असल्याचे दिसत आहे.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो?